मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: महाराष्ट्रातील लाखो भगिनींसाठी एक आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर आणि लाभार्थी महिलांमध्ये चर्चा आहे की, ४,५०० रुपयांऐवजी आता थेट ६,००० रुपये खात्यात जमा होणार आहेत. ही रक्कम नेमकी कशी आणि कोणाला मिळणार? यामागचे तांत्रिक कारण आपण सविस्तर समजून घेऊया.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा ₹१,५०० दिले जातात. मात्र, अनेक महिलांचे मागील काही महिन्यांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडले होते.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केल्यानुसार, ज्या महिलांनी ई-केवायसी करताना चुका केल्या होत्या, त्यांना आता दुरुस्तीची मोठी संधी देण्यात आली आहे.
शासकीय पडताळणीत असे आढळले आहे की, अनेक महिलांच्या अर्जात खालील चुका होत्या: १. चुकीचा पर्याय: अर्ज भरताना चुकून “सरकारी नोकरी” किंवा “पेन्शनधारक” पर्याय निवडणे. २. बँक लिंक: आधार कार्ड बँक खात्याशी लिंक (Aadhar Seeding) नसणे. ३. तात्रिक त्रुटी: चुकीचा IFSC कोड किंवा चुकीचे नाव असणे.
तुमचे थकीत ६,००० रुपये मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा:
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वी झाली आहे, त्यांचे प्रलंबित हप्ते २० फेब्रुवारी २०२६ नंतर टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.









